Pooja Khedkar : पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, नोटीस फाडली, वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा कारनामा.
बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली. पोलिसांना सहकार्य केले नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र, घरी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत अत्यंत भयानक प्रकार घडला. पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडण्यात आले.