Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे संकेत, भांडणं माझ्याकडून नव्हतीच, आता मिटवली… चला!” — मनसेसोबत युतीचं दार उघडं?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘टाळी’ची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या यूट्युब मुलाखतीत उद्धव ठाकरेंकडे मैत्रीचा हात पुढे करत ‘टाळी’चा इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही थेट जाहीर कार्यक्रमात “भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती आता मिटवली… चला!” असे म्हणत संभाव्य युतीचा संकेत दिला.