Anurag Kashyap : शब्द मागे घेणार नाही, पण माफी घ्या हवी असेल तर म्हणत ब्राह्मणांवर वादग्रस्त विधानानंतर अनुराग कश्यपचा माफीनामा
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ब्राह्मण समाजावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर टीका, ट्रोलिंग आणि कायदेशीर कारवाईच्या मागणीनंतर अनुरागने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माफीनामा जाहीर केला आहे. मात्र, त्याने स्पष्ट केलं की, ही माफी संपूर्ण पोस्टसाठी नसून फक्त त्या एका ओळीसाठी आहे, जी त्याच्याच मते ‘आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट’ काढून वापरली जात आहे.