MP Dr. Medha Kulkarni : अजान रोखण्याचा आरोप: खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचे खंडन, आरोप सिद्ध करण्याचे आव्हान
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यावर अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून अटकेची मागणीही करण्यात आली आहे. हा वाद हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी उफाळून आला, जेव्हा कुलकर्णी त्या परिसरात होत्या. आरोपानुसार, त्यावेळी जवळील ऐतिहासिक छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्ग्यात सुरू असलेल्या नमाजाच्या अजानला रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असा दावा दर्गा ट्रस्टने तक्रारीत केला आहे.