Nana Patole : महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळवीर, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करताहेत, नाना पटोले यांचा आरोप
ज्याप्रमाणे पहलगाम मध्ये धर्म विचारला गेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दुकानदार कडे जाऊन त्यांच्या धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावी असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी दापोलीच्या सभेमध्ये केले. यावरून राणे यांच्यावर वाचाळवीर मंत्री अशी टीका करत भाजप दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करते आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे