Pakistan’s : पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली हल्ला होण्याची भीती
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकारची धास्ती वाढली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.