Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड आहे. दोन्ही पुत्र कर्तृत्ववान निघावे हे भाग्य मला मिळालं आहे. मुलांचं कौतुक वडील करतात आहेत असं नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो आहे,” अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर सभेत त्यांचे पुत्र आणि आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.