Harshvardhan Sapkal : मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू ? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
मी कुठलीही शिवीगाळ केलेली नाही, अपशब्द वापरलेला नाही त्यामुळे ते वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.