Kishori Pednekar : दिशा सालियनच्या कुटुंबाला आताच का जाग आली? किशोरी पेडणेकर यांचा सवाल
दिशा सालियनच्या कुटुंबाला आताच का जाग आली? हे आरोप पैशांच्या नादी लागूनच केलेत. तिच्या वडिलांना कोणाचे तरी सतत फोन यायचे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वकाही चालू आहे. एक आरोप करून झाला, आता दुसरा आरोप सुरू केला आहे. दुसरं काय? असे म्हणत हे आरोप राजकीय असल्याचा दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.