Chief Minister : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, मुख्यमंत्री कक्षालाही दिला नाही प्रतिसाद, मुख्यमंत्र्यांनीच सुनावले
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर संताप व्यक्त होत असताना या रुग्णालय प्रशासनाची मुजोरीही समोर आली आहे. तनिषा भिसे प्रकरणात मुख्यमंत्री कक्षालाही या रुग्णालयाने प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून रुग्णालयाला सुनावले आहे.