Raj Thackeray : डॉ. बाबासाहेब म्हणाले होते मुंबई मराठी भाषिकांचीच, राज ठाकरे यांनी करून दिली आठवण
Raj Thackeray : मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अशी आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून दिली.