Ponmudi : तमिळनाडूचे मंत्री पोनमुडी यांचे वादग्रस्त विधान, उपमहासचिव पदावरून हटवले, मात्र मंत्रिपद कायम
तमिळनाडूचे उच्चशिक्षण व वनमंत्री आणि डीएमकेचे ज्येष्ठ नेते के. पोनमुडी यांनी हिंदू धर्मातील शैव-वैष्णव परंपरा आणि महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भावनांना ठेच पोहोचल्याचे सांगत अनेक हिंदू संघटनांनी तसेच राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांच्या मंत्रिपदावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.