MNS : मुंबई महापालिकेच्या प्रश्नांवर मनसेचे ‘प्रतिसभागृह’, आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांना आमंत्रण
मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा – निवडणूक कधी होणार? सध्या महानगरपालिकेचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून चालवला जात असून, निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईतील समस्यांवर मोकळेपणाने चर्चा घडवण्यासाठी “प्रतिसभागृह” या अभिनव संकल्पनेची घोषणा केली आहे.