Pahalgam : काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर भीषण दहशतवादी हल्ला; २५ जण ठार झाल्याची भीती
काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामच्या बैसरण खोऱ्यात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. हा गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण नागरी हल्ला ठरतोय, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.