Nitesh Rane : खरेदीपूर्वी दुकानदाराचा धर्म विचारा, हनुमान चालिसा म्हणायला लावा, नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य
पहलगाम हल्ल्यावर देशात संताप व्यक्त होत आहे. धार्मिक आधारावर फूट पडू नये अशी आवाहने केली जात असताना भाजपचे मंत्री नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून कुठलीही वस्तू विकत घेण्याआधी त्याचा धर्म विचारला पाहिजे. दुकानदाराला हनुमान चालिसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे.