Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याबाबत झिपलाइन ऑपरेटरवर संशय
काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेल्या एका पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटरवर संशय व्यक्त केला आहे. या पर्यटकाचा व्हिडीओ समोर आला असून तोच संदर्भ देत या पर्यटकाने झिपलाइन ऑपरेटर 100 टक्के संशय व्यक्त केला आहे .राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्या झिपलाइन ऑपरेटरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.