Elon Musk : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सायबर हल्ला? इलॉन मस्क यांचा दावा

Elon Musk : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सायबर हल्ला? इलॉन मस्क यांचा दावा

Elon Musk

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क: Elon Musk सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर सोमवारी जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर ‘X’ चे सीईओ इलॉन मस्क यांनी सांगितले की, या प्लॅटफॉर्मवर “प्रचंड सायबर हल्ला” सुरू आहे आणि अजूनही सुरूच आहे. त्यांनी असा संशय व्यक्त केला की या हल्ल्यामागे कोणता तरी मोठा गट किंवा एखादे राष्ट्र असू शकते. “या हल्ल्याचा शोध घेत आहोत…” असे मस्क यांनी ‘X’ वर पोस्टमध्ये लिहिले. सध्या हा सायबर हल्ला नेमका कोणी केला आणि त्याचा उद्देश काय होता, याचा शोध अद्याप सुरू आहे.Elon Musk

सोमवारी दिवसभरात ‘X’ वर अनेक वेळा सेवा खंडित झाल्याचे ‘Downdetector’ या आउटेज ट्रॅकर वेबसाइटच्या अहवालातून समोर आले. यामुळे हजारो युजर्सना त्यांच्या खात्यांमध्ये लॉग इन करता आले नाही. अमेरिकेत तब्बल 40,000 पेक्षा जास्त युजर्सनी समस्येची नोंद केली होती, तर यूकेमध्येही 10,800 पेक्षा अधिक युजर्सना ‘X’ अडचणींचा सामना करावा लागला.

अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत ‘X’ बंद असल्याचे सांगितले. काही जणांनी पोस्ट करत लिहिले, “ट्विटर (X) काही वेळासाठी बंद झाले होते पण आता सुरू झाले आहे?”, तर काही जणांनी “ट्विटर डाउन झाल्यामुळे आता सर्वच ‘X’ वर येत आहेत” असे लिहिले. मात्र, काही वेळातच सेवा पुन्हा पूर्ववत झाल्या.

‘Downdetector’ च्या अहवालानुसार, 56% युजर्सना अ‍ॅपमध्ये समस्या आल्या 33% युजर्सना वेबसाइटवर अडचणी आल्या उर्वरित समस्यांसाठी विविध तांत्रिक कारणे असल्याचे सांगण्यात आले

यापूर्वीही मार्च 2023 मध्ये ‘X’ ला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी आल्या होत्या, तेव्हा अनेक युजर्सना लॉग इन करता येत नव्हते, तसेच काही लिंकही काम करत नव्हत्या.

इलॉन मस्क यांनी 2022 मध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर त्याचे नाव बदलून ‘X’ असे ठेवले. यानंतर ‘ट्विट’ ऐवजी ‘पोस्ट’ आणि ‘रिट्विट’ ऐवजी ‘रिपोस्ट’ असे शब्द वापरण्यात आले. तसेच, प्रसिद्ध ब्लू बर्ड लोगो हटवून, पांढऱ्या ‘X’ ला काळ्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात आले.

Cyber ​​attack on social media platform ‘X’? Elon Musk claims

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023