विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही. आता खूप ऊन आहे, नाही तर त्यांना आताच कचका दाखवला असता. परंतु जे व्हायचं ते होणार आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मुंबईला येण्याचा इशारा दिला आहे.
जरांगे म्हणाले, आता डाव कसे टाकायचे हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आरक्षण आम्ही घेणारच आहोत. अजून थोडं थांबू आणि अशी पण तयारी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावं.
शंभर टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. योग्य वेळी योग्य होणं गरजेचं होतं. त्यावेळी आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं होतं आणि ओबीसींच्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याची अधिसूचना सरकारने काढली पाहिजे. सरकारने अधिसूचना काढायलाच उशिर लावला. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही मागितलं त्यावेळी आम्ही तुम्हाला जातीवादी म्हटलं नाही. फक्त गरिबांच्या लेकरासाठी आरक्षण लागतं म्हणून मागत आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करताय म्हणजे तुम्ही जातीवादी आहात, अशी टीका जरांगे यांनी केली. Manoj Jarange
लाडकी बहीण योजनेबाबत जरांगे म्हणाले, सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होतं. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले. अगदी तिसऱ्या तळात राहणाऱ्या लाडक्या बहिणीला सुद्धा पैसे दिले. मग आज का या लाडक्या बहिणींना बाहेर काढायला लागले? याचा अर्थ त्यांचा आता भागलंय. त्यामुळे त्यांना आता फक्त गोड बोलायचं. मात्र करायला चुकायचं नाही. त्यांच्याकडे जसा कावा आहे, तसा गोरगरिबांकडे सुद्धा आहे. शेवटी बहीण ही बहीण असते. त्यामुळे तिला का बाहेर काढलं?
Manoj Jarange warns of coming to Mumbai again to demand reservation
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श