विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरु झालेल्या योजनांवर अजित पवार यांचे कुऱ्हाड चालविणे सुरूच आहे. शिंदे यांची आनंदाचा शिधा योजना बंद केल्याची चर्चा आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही.Ajit Pawar
महाराष्ट्रातील विविध सणांच्यावेळी शिधापत्रिका धारकांना अवघ्या 100 रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, साखर, हरभरा डाळ, आणि पाम तेल देण्याची योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आली. दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यावेळी देण्याची योजना सुरु केली होती. ही योजना आता बंद करण्यात आली असल्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. महायुती सरकारला जनतेने निवडून दिले आहे. त्यांना आनंद झाला आहे, मात्र जनतेच्या आनंदाशी आता त्यांना काही देणेघेणे राहिलेले नाही, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा योजनेला निधीची तरतूदच केलेली आढळून आलेली नाही. आनंदाचा शिधा ही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. महाराष्ट्रातील प्रमुख सण दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती या सणांच्या निमित्ताने रेशन दुकानांवर रेशनकार्ड धारकांना अवघ्या 100 रुपयांमध्ये पाच जिन्नस असलेला शिधा दिला जात होता. आकर्षक पॅकिजिंग त्याचे केले जात होते.
आनंदाचा शिधा योजनेसाठी शिंदे सरकारमध्ये 602 कोटी रुपये निधी दिली जात होता. गुढीपाडवा सण काही दिवसांवर आला आहे. मात्र आनंदाचा शिधा योजनेचा उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात नव्हता. जवळपास एक कोटी 63 लाख नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत होता.
निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थाटन योजना सुरु केली होती. काही हजार नागरिकांनी या योजनेचा लाभही घेतला. विविध जाती, धर्मांच्या धार्मिक स्थळांचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना घडवले होते. या योजनेसाठीही अर्थमंत्री अजित पवारांनी तरतूद केलेली नाही
Aanandacha Shidha closed , Ajit Pawar’s axe on Eknath Shinde’s schemes
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श