विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Prime Minister पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॉरिशसच्या दौऱ्यावर आहेत. मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाकुंभमेळ्यातील गंगाजलाने भरलेला गडू भेट दिला. त्यांच्या पत्नीला बनारसी साडी भेट दिली.Prime Minister
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांची आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली. या भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसचे राष्ट्रपती धरम गोखूल यांना महाकुंभातील त्रिवेणी संगमाच्या पाण्याचा गंगाजलाने भरलेला तांब्याचा गडू भेट दिला. बिहार येथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ मखाणेही त्यांना भेट म्हणून दिले. राष्ट्रपती धरम गोखूल यांच्या पत्नी ब्रिंदा गोखूल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनारसी साडी भेट म्हणून दिली. गुजरातमध्ये तयार झालेल्या एका खास खोक्यात ती साडी ठेवून ते गिफ्ट त्यांनी ब्रिंदा यांना दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत.
दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली आहे. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.
पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी ही घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले. ते म्हणाले की, त्यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत विविध देशांकडून २१ पुरस्कार मिळाले आहेत.
मोदी म्हणाले, “मॉरिशसच्या पंतप्रधानांनी नुकतेच जाहीर केले की, ते मला त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहेत. मी त्यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारू इच्छितो. हा भारत आणि मॉरिशसच्या ऐतिहासिक संबंधांचा सन्मान आहे.
Prime Minister gifts Mauritius President Dharam Gokul with a jug filled with Ganga water from the Mahakumbh Mela
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श