विशेष प्रतिनिधी
ठाणे: Rupali Chakankar विरोधातील महिला देखील माझ्यावर फिदा आहेत त्यामुळे साडी आणि टिकली पुढे त्या जात नाही. सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी माझ्यावर टीका करतात असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर केला आहे.Rupali Chakankar
चांगला मेकअप करून पक्षाच्या कार्यक्रमात मटकायचे एवढेच काम महिला आयोग अध्यक्ष करत आहेत, अशी जहरी टीका रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देताना चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाची गरिमा फार मोठी आहे. रोहिणी खडसे यांचा अभ्यास नाही. त्यांच्याबाबत आपण काय वक्तव्य करणार? गेल्या दोन वर्षांमध्ये साड्या आणि टिकली वर आंदोलन केले आणि आता पुढील पाच वर्षे देखील त्यावरच आंदोलन करणार. कारण त्यांची वैचारिकता नाही की कुठला विषय मांडावा. त्यामुळे या लोकांवरत चर्चा करण्यापेक्षा आपण चांगले काम करणे महत्त्वाचे आहे.
खडसे बाईंची जी संघटना आहे ती मी बांधलेली आहे. त्यांना ती संघटनाच नीट चालवता येत नाही असा आरोप करत चाकणकर म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी, रूपाली चाकणकर यांच्यावर वक्तव्य केल्यानंतर मीडियासमोर दिसतो म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले. काल कार्यक्रम केले. कुठेही बातमी झाली नसेल. त्यामुळे रूपाली चाकणकरांवर बोलल्यानंतर बातमी होईल. त्याप्रमाणे बातमी झाली. ही ताकद आहे रूपाली चाकणकरची.
त्या म्हणाल्या, स्वतःचा 6 टर्म सुरक्षित असणारा वडिलांचा मतदार संघ लेकीला दोनदा देऊन देखील, साम दाम दंड भेद वापरून देखील, वडिलांचे नाव वापरून देखील निवडून येत नाही. त्याच मतदार संघातून वडील निवडून जातात. मात्र आपण निवडून जात नाही त्याचे आत्मचिंतन रोहिणी खडसे यांनी करणे फार गरजेचे आहे. दुसऱ्यांचे कमेंट वाचा म्हणणाऱ्यांनी स्वतःच्या कमेंट बॉक्समध्ये बंद केले आहेत. शेवटी वार केला तर प्रति वार झेलायला सुद्धा खमखमीत हृदय आणि ताकद लागते.
महिला सुरक्षा विषयावर बोलताना चाकणकर म्हणाल्या महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यांनी ठामपणे मांडाव्यात त्यांना आम्ही विश्वास देऊ. समाजातील विकृती ठेचून काढायची आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाली विरोधकांचे तेव्हा पासून पोट दुखायला सुरू झाले. विरोधक कोर्टापर्यंत गेले. हेच विरोधक लाडक्या बहिणीचे बॅनरबाजी करून सर्व फायदे घेत होते. एक कलमी कार्यक्रम करत होते. यशस्वी ठरलेली योजना आहे. जो शब्द दिलाय तो तत्परतेंने पूर्ण करेल असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे, असेही चाकणकर म्हणाल्या.
Women in opposition also attracted by me, Rupali Chakankar’s counterattack on Rohini Khadse
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श