विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Modi government मोदी सरकारने घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी मोदी सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयक २०२५ सादर केले.Modi government
विधेयकानुसार, भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणाहून येणारी कोणतीही व्यक्ती वैध पारपत्र किंवा इतर प्रवास दस्तऐवज, वैध व्हिसा असल्याशिवाय हवाई, जल किंवा जमीन मार्गे भारतात प्रवेश करू शकत नाहीत.
इमिग्रेशन अँड फॉरेनर्स विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर भारतातील इमिग्रेशन आणि परदेशी नागरिकांशी संबंधित चार जुने कायदे रद्द केले जातील. यामध्ये परदेशी कायदा १९४६, पासपोर्ट कायदा १९२०, परदेशी नोंदणी कायदा १९३९ आणि इमिग्रेशन कायदा २००० यांचा समावेश आहे.
या विधेयकात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला प्राधान्य देऊन परदेशी नागरिकांच्या प्रवेश आणि वास्तव्यावर कडक नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. जर कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असेल किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने बेकायदेशीरपणे भारतात नागरिकत्व मिळवले तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, जर एखाद्या परदेशी नागरिकाच्या प्रवेशामुळे भारताचे इतर कोणत्याही देशाशी असलेले संबंध प्रभावित होत असतील तर त्याला किंवा तिला देशात प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते.

Modi government’s bill to prevent infiltration, strict rules on entry and stay of foreign nationals
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श