विशेष प्रतिनिधी
बीड : लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादात सापडलेला भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले Khokya Bhosale याला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून त्याला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. Khokya Bhosale
खोक्याच्या अटकेप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले, गुन्हा दाखल झाल्यापासून खोक्या फरार होता. त्याचा शोध घेतला जात होता. प्रयागराजला त्याचं शेवटचं लोकेशन सापडलं. त्याला तिथून अटक करण्यात आली. आमची टीम तिथे पोहोचली असून त्याला इथे आणण्यात येणार आहे. दुसऱ्या राज्यात अटक केल्याने ट्रान्सिट रिमांड घ्यावी लागते. त्याकरता परवानगी घ्यावी लागते. लोकल कोर्टाची परवानगी घेऊन त्याला इथे आणण्यात येणार आहे.
सतीश भोसले याने लाकडी बॅटने एकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. खोक्या उर्फ सतीश भोसले याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते.
त्यानंतर खोक्या भोसलेचा दुसरा व्हिडिओही व्हायरल झाला. यामध्ये तो पैशांचं बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, हातात-गळ्यात सोन्याचे दागिने घालून मिरवणे असे दृश्य दिसत होते. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर त्याच्या घरात वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले. त्यामुळे खोक्या भोसलेवर आतापर्यंत वन विभागात आणि शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
खोक्या भोसलेला अटक केली ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने जी चूक केलीय, त्यासंदर्भात त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्यावर कारवाई होईल”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
Khokya Bhosale finally arrested from Prayagraj
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श