विशेष प्रतिनिधी
कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील. नितेश राणे यांनी असे वक्तव्य का केलं? त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू माहित नाही, पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जो मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे याना उत्तर दिले.
मी म्हटलय दोन्ही बाजूच्या सन्मानीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे” असं अजित पवार म्हणाले. “इतिहास आपण वाचला आहे. इतिहासात अनेक मोठमोठ्या लोकांनी जी काही पुस्तक लिहिली आहेत, इतिहासाच संशोधन केलं आहे. इतिहासाची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जे लोक होते, त्यात मुस्लिम लोक सुद्धा आहेत. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील. त्यांनी अस वक्तव्य का केलं? त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू माहित नाही, पंरतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारे जो मुस्लिम घटक आहेत, ते देशप्रेमीच आहेत” असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आज कराड प्रिती संगमावर जाऊन अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सहन होणार नाहीत अशा प्रकारची वक्तव्य फक्त एकाच बाजूने नव्हे, तर दोन्हीकडून होत आहेत आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे.
सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली. यशवंतराव चव्हाणांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाणांची विचारधार कधीही सोडणार नाही किंवा ढळू देणार नाही. त्याच विचारधारेने महाराष्ट्राच भले होणार, सगळ्या समाजाच भले होणार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व घटकांना न्याय देण्याच काम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे. म्हलार मटणाच्या मुद्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदू मटण दुकानदारांकडूनच मटण घ्यावे असावं राणे म्हणाले आहेत.
Muslims who are proud of the country are patriots, Ajit Pawar’s reply to Nitesh Rane
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray तुमच्या बापाने मुंबई दिली नाही, ती मराठी माणसाने लढून मिळवली, उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका
- Uday Samant आता मंत्री उदय सामंत अडचणीत, वडिलांच्या कंपनीने महामार्गाच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप
- खोटे आरोप करण्याची हिम्मत… धनंजय मुंडे यांचा सुरेश धस यांना इशारा
- क्रूर, लुटारू औरंगजेबाचे खानदानच लुटेरे, बाबा रामदेव म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजच आमचे आदर्श