विशेष प्रतिनिधी
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार Jai Pawar यांचे ठरले असून लवकरच लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सूनबाई होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे.विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पवार घरात सनईचे सूर घुमणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. जय पवार यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलेच सक्रिय होते. उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केला. गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचं सांगितलं जातं.
जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडणार आहे .ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घराच्या सुनबाई आहे. जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा हा १० एप्रिल रोजी ठरला आहे. तर लग्न हे डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज जय पवार आणि ऋतुजा पाटील या जोडीने जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी प्रथमच जाहीर भेट घेतली. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार अद्याप अविवाहित आहेत.