विशेष प्रतिनिधी
मुंबई : Madhav Bhandari भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेवर येण्याच्या आधीपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणारे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या प्रामाणिकपणाला अखेर फळ मिळणार आहे. विधान परिषदेच्या पाच जागांवर होत असलेल्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.Madhav Bhandari
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आहे. यामध्ये एक नाव माधव भंडारी यांचे आहे. आतापर्यंत अनेक वेळा त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्येक वेळी त्यांना हुलकावणीच मिळाली. गेल्या वर्षी राज्यसभेच्या महाराष्ट्रातून तीन जागा निवडून गेल्या होत्या. त्यावेळी भाजपने अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. यावेळीही भाजपकडून माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट दिले नाही. त्यानंतर माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी यांनी एक ट्वीट केले होते . त्यांना म्हटले होते की, १२ वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही. १२ वेळा चर्चा आणि १२ वेळा अपेक्षाभंग…. या भावनिक पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. माधव भंडारी आमचे नेते आहेत तर त्यांना योग्य वेळी सगळं मिळेल असे ते म्हणाले होते. त्याप्रमाणे यावेळी त्यांचा विचार होण्याची शक्यता आहे.
यामध्ये दुसरे नाव दादाराव केचे आहे. आर्वी मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले केचे यांचे तिकीट कापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी केचे यांनी बंडखोरीची तयारी केली होती. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली. त्यांनाही विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.
Will honesty bear fruit? Madhav Bhandari, Dadarao Keche will get the Legislative Council!
महत्वाच्या बातम्या
- Amarsingh Pandit धनंजय देशमुख यांच्या साडूचा प्रताप! राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत
- Shambhuraj Desai प्रकल्पग्रस्तांवार अन्याय होऊ देणार नाही, शंभूराज देसाई यांचे आश्वासन
- Beed : बीडमध्ये जातीयवाद संपविण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा अभिनव निर्णय
- Manoj Jarange : गोड बोलून जनतेची मान कापली,आता भूमिका आंदोलनाची, मनोज जरांगे यांचा इशारा