विशेष प्रतिनिधी
पुणे: Dhangekars माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र महायुतीतील नेत्यांसोबत पहिल्या दिवसापासून त्यांची खडाजंगी सुरू झाली आहे.Dhangekars
पत्नीला अटक होण्याच्या भीतीने रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर बोलताना धंगेकर म्हणाले होते की अजितदादांना तर यांनी जेलच्या दारात बसवलं होते. ट्रकभर पुरावे सादर केले होते. पंतप्रधान मोदी यांनीदेखील अजित पवारांवर टीका केली होती. पण त्यांना पक्षासोबत घेऊन अर्थमंत्री करण्यात आले.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मानकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांना हू इज धंगेकर नव्हे तर ही इज रियल क्रिमिनल धंगेकर कळेल. लोकांची कामं अडवून खंडणी वसूल करायच. रविंद्र धंगेकर यांनी स्वतः चार दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केलाय. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन हे निवडून आले. नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले.
पुण्यातील पब संदर्भात आंदोलन करायची हप्ते वसूल करून नंतर आंदोलन स्थगित करायची. कॉर्पोरेशनच्या कामांमध्ये बिल्डर लोकांची कामं अडवून खंडणी वसूल करायची. लक्ष्मीरोडच्या सराफांकडून घर दुरुस्तीच्या नावानं कॉर्पोरेशनकडून बांधकामाला परवानगी घेऊन सगळ्या सोन्या मारुती चौकातील बांधकामं बेकायदेशीर करून पैसे वसूल करायचं, असा आरोप दीपक मानकर यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर केला आहे.
वक्फ बोर्डाची मुसलमान समाजाची गणेश पेठेतील जमीन गिळंकृत केल्याचा आरोपही रविंद्र धंगेकर यांच्यावर असल्याचे सांगताना दीपक मानकर म्हणाले, १५० कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठून आली? याची चौकशी लाचलुचपत विभागात त्यांच्याविरोधात सुरु असून क्राईम ब्रांच युनिट १ ला खंडणीचा गुन्हा प्रलंबित आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा या पडीक आमदाराला दादांनी केलेल्या उपकाराची जाणीव नाही. वाटेल ते स्टेटमेंट करतायेत. शिंदे गटात जाऊन स्वतःला भविष्यात पोलिसांकडून होणारा त्रास कमी होणार नाही. गृह खाते देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. याची जाणीव ठेवा. केलेली पापे इथेच फेडायची आहेत. मुस्लीम समाजाला वापरून त्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केलीय.
Dhangekars statement truckload of evidence against Ajit pawar, Deepak Mankar got angry
महत्वाच्या बातम्या
- Amarsingh Pandit धनंजय देशमुख यांच्या साडूचा प्रताप! राष्ट्रवादीचा आणखी एक नेता अडचणीत
- Shambhuraj Desai प्रकल्पग्रस्तांवार अन्याय होऊ देणार नाही, शंभूराज देसाई यांचे आश्वासन
- Beed : बीडमध्ये जातीयवाद संपविण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा अभिनव निर्णय
- Manoj Jarange : गोड बोलून जनतेची मान कापली,आता भूमिका आंदोलनाची, मनोज जरांगे यांचा इशारा