विशेष प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना चक्क मुख्यमंत्री पदाच्या दिलेल्या ऑफर मुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्रीपद देतो असे ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा यंदाही अपूर्ण राहिली आहे. या दोघांनी आमच्याकडे यावे. दोघांना आलटून-पालटून मुख्यमंत्री करू, अशी ऑफर त्यांनी दिली आहे.
पटोले म्हणाले, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती खूप वाईट आहे. पक्ष टिकेल की नाही, याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहे. भाजप त्यांना जगू देत नाही. भाजपची ती सवयच आहे. देशात ज्यांच्या सोबत युती केली, त्यांना संपवण्याचे काम भाजपने केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपने बंद केल्या आहेत. त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध रहावे. आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत.
आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलावणार आहोत. त्यांना पाठिंबा देऊ. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. भाजपच्या अधिपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.