विशेष प्रतिनिधी
मुंबई: Anjali Damania केज न्यायाधीश निलंबीत अधिकाऱ्यांसोबत होळी खेळत असतील गंभीर परिस्थिती आहे. या न्यायाधिशांकडून हे प्रकरण काढून दुसऱ्या न्यायाधिशांकडे हे प्रकरण द्याव अशी मागणी मी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले होते.Anjali Damania
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी ज्यांच्यासमोर सुरू आहे ते न्यायाधीश सुधीर भाजीवाले हे या प्रकरणात निलंबित केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत होळीचा रंग खेळत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ अंजली दमानिया यांनी पोस्ट केले होते. यावर त्या म्हणाल्या, दोन पोलिस अधिकारी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांना सहआरोपी करा अशी मागणी मी आणि धनंजय देशमुख यांनी अनेक वेळा केली होती.
ते दोन अधिकारी जर केज न्यायाधिशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठे तरी हे खुप गंभीर होत चाललंय राजेश पाटील या अधिकाऱ्याने २९ तारखेला जेव्हा कराडने आवादा कंपनीकडे पुन्हा खंडणी मागतली विष्णू चाटेच्या ऑफिसमधून राजेश पाटील उपस्थित होते . ते आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे. प्रशांत महाजन सुद्धा आरोपींना मदत करत होते,. संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे कटकारस्थान झालं तिथे प्रशांत महाजन उपस्थित होते.ज्या दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात यायला आली होती. त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. न्यायाधिशांना एक प्रोटोकॅाल असतो , तसं त्यांनी केल नाही