विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Kirit Somaiya बांगलादेशी म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी भाजपा नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्यांकडून दबाव आणण्यात येत असल्याचे खळबळजनक आरोप सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.Kirit Somaiya
लतीफ पठाण म्हणाले, ज्या 406 लोकांविरुद्ध सोमय्या यांनी तक्रार केली होती, त्यांची तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व नेमलेल्या पथकमार्फत चौकशी करण्यात आली आहे. ते नागरिक स्थानिक रहिवासी असल्याचे पुरावे आढळले आहेत. आम्ही एकही बांगलादेशीला जन्म प्रमाणपत्र दिले नाही. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे. कुणी बांगलादेशी आढळलाच नाही, तर आम्ही खोटे गुन्हे कसे दाखल करणार? 403 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. तसे केले नाही म्हणून माझ्यावर खोटे आरोप होत आहे.
सिल्लोड तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी शहरातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे, परंतु किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील 406 जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या अनुषंगाने त्यांनी नुकतीच तिसऱ्यांदा सिल्लोड येथे येऊन पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेले षड्यंत्र आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून 40 ते 50 वर्षांपूर्वी जन्मलेल्या तालुक्यातील 406 लोकांना केवळ आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिले आहे. यात फक्त तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित 403 जणांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
यापूर्वी खोटी कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात सोमय्या यांच्या तक्रारीचा समावेश करण्यात आला आहे. आता वरील लोकांची कागदपत्रे तपासून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर चौकशीत कुणी दोषी आढळले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी म्हटले आहे.
Serious allegations against Kirit Somaiya, pressure to file false cases as Bangladeshi
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!