विशेष प्रतिनिधी
सांगली : Ncp Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता फोनवर हॅलो ऐवजी जय शिवराय असे म्हणण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.Ncp Sharad Pawar
सांगलीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी यापुढे कोणालाही फोन लावला किंवा कोणाचा आला तर बोलण्याची सुरूवात ‘हॅलो’ऐवजी ‘जय शिवराय’नं करायची, अशी घोषणा केली. हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आदेश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. सांगलीतून ज्याची सुरुवात होईल ती गुढी भविष्यात राज्यात उभारली जाईल, असे ते म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले, आपण निवडणुकीत सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. परंतु,दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाबूत झाला. छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असं आवाहनही शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
महाराष्ट्रात एकीकडे सुजलाम सुफलाम करण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळात पक्षाकडून तालुकास्तरावरही मेळावे घेतले जाणार आहे. जो कार्यकर्ता सक्षम आहे, त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. तसेच जो पक्षात येण्यास इच्छुक आहे, त्याला देखील जबाबदारी देण्याचा विचार करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर भाष्य करताना ते म्हणाले,मी न्यायालयाच्या विरोधात बोलत नाही. पण कोर्ट म्हणत असेल,खर्च वाढेल म्हणून निवडणुका परत नको आणि अशा पद्धतीने निकाल देत असतील तर राज्यात पुन्हा निवडणुका होतील की नाही,अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
Ncp Sharad Pawar orders workers to start their speech with Jai Shivaji instead of Hello
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!