विशेष प्रतिनिधी
मुंबई: Ajit Pawar समाज कल्याण विभागाचा निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळविल्याने मंत्री संजय शिरसाट चांगलेच संतापले आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.Ajit Pawar
शिरसाट म्हणाले, लाडकी बहिण योजना चांगली आहे. त्यासाठी पैसे दिले पाहजे. यात दुमत नाही. परंतु विकासाची कामे कमी केले हरकत नाही. मात्र माझा आक्षेप असा आहे की सामाजिक न्याय व आदिवासी खात्याला घटनेच्या तरतुदीनुसार पैसे द्यावे लागतात. त्यात कट करता येत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी ४ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी १५०० कोटी, ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका माझ्या विभागाला बसला आहे.
हा विभाग मागास लोकांना प्रवाहात आणण्यासाठी आहे. मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी जर या खात्याच्या निधीमध्ये कपात केली तर कामे कशी होतील? यासाठी तरतूद करून द्या असं माझं मत आहे. पैसे इतर ठिकाणी वळवले याचे दुर्गामी परिणाम होतील, उद्रेक होईल. यासाठी मी विनंती करेल सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचे पैसे कपात करू नये, यासाठी मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. माझ्या खात्यातून पैसे घेताना संमती घेतली पाहजे होती. संमती मागितली असती तर मला देता आली नसती. हे बंधन आम्हाला कायद्याने दिले आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
Ladki Bahin Nidhi controversy, Social Welfare Minister Sanjay Shirsat angry with Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!