विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : “Harshvardhan Sapkal महायुतीचे हे अनेक फेल्युअर असलेले सरकार असून टोळ्या एकत्र येऊन स्थापन केलेले आहे. हे गँग ऑफ सरकार असून यात मानपानाचा खेळ सुरू आहे,” अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली.Harshvardhan Sapkal
सपकाळ यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना म्हटले, “काँग्रेस हे एका आंदोलनाचे नाव आहे. भाजप सरकारने महाराष्ट्राच्या सद्भावनेला तडे जाऊन दिले असून ‘खोक्या रिटर्न्स’ ही त्यांची नवीन संकल्पना आहे.या अगोदर पन्नास कोटी एकदम ओके असं ऐकलं होतं, आता नवीन खोक्यांचा जन्म झाला आहे.
महाविकास आघाडीत अडचणी आल्या, मात्र आघाडी आणि युती ही अपरिहार्यता असल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस महाविकास आघाडी करताना अडचणी आल्या, पण भाजपने महाराष्ट्राची सद्भावना लयाला नेण्याचे काम केले आहे,” असे ते म्हणाले.
भाजपवर कोकणातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याचा आरोप करताना सपकाळ म्हणाले, “भाजप कोकणातील नैसर्गिक संपत्ती उद्योजकांना विकू पाहत आहे. उद्योगपतींना सांभाळण्यासाठी कोकणातील सामान्य माणसांचा बळी देऊ नका. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंबई गुजरातमध्ये गेली नाही, याचे शल्य दिल्लीतल्या दोन नेत्यांना आहे.
मराठी माणसांचा आणि महाराजांचा इतिहास पुसण्याचा डाव भाजपने आखला आहे. औरंगजेबाची कबर ही महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले, “देवेंद्र फडणवीस यांच्या जॅकेटच्या खिशात महाराष्ट्राची सत्ता आहे. भाजप स्थानिक निवडणुका घेणारच नाही. ऑक्टोबरचा पेपर आहे, त्यावर मी मार्चमध्ये बोलणार नाही.
Gang of government is playing with pride”, Harshvardhan Sapkal attacks BJP
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!