विशेष प्रतिनधी
नागपूर : नागपुरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली, महाल परिसरात झालेल्या या राड्यात अनेक पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. बाहेरून आलेल्यांनी ही दंगल पेटविली असा आराेप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे
औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये दोन गटात वाद झाला. झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली, त्यानंतर वाहनांची तोडफोड करत अनेक वाहने पेटवून दिली. त्यामुळे नागपूरच्या महल भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या दगडफेकीत 8-10 पोलीस जखमी झाले असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत. तर या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 30 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपूरमध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की, सकाळी एक आंदोलन झालं, पण पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली. रात्री महाल परिसर आणि इतर परिसरात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांना मारहाण करण्यात आली. बाहेरून आलेल्या लोकांनी सामान्य लोकांची घरे पेटवली. टिपून दगडफेक करण्यात आली आहे.
आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर आली होती. त्यांनी हिंसा केली. या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी. मी स्वत: नागपूरला जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे, असं प्रवीण दटके यांनी सांगितलं.
VIDEO | Visuals from Nagpur where violence erupted on Monday as stones were hurled at police. The city saw several incidents of stone-pelting and arson.
(Source: Third Party)#NagpurViolence pic.twitter.com/sr37c1dxxE
— Press Trust of India (@PTI_News) March 17, 2025
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर येथील महाल भागात दगडफेकीच्या दुर्दैवी घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे. माझे सर्व नागपूरकरांना नम्र आवाहन आहे की, कृपया आपण सर्वांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे. नागपूर शहराचे सुजाण नागरिक या नात्याने शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही, ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून नागपूर शहराकडे पाहिले जाते. ही शहराची परंपरा आपण सर्वांनी जपावी. तसेच, प्रशासनावर संपूर्ण विश्वास ठेवत कुठल्याही अफवांना बळी न पडता, नागपूर शहरामध्ये शांतता नांदण्यासाठी सहकार्य करावे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात सागर बंगल्यावर रात्री उशिरा महत्वाची बैठक झाली. समाजकंटकांवर अंकुश लावण्यासंदर्भात चर्चा झाली.
Nagpur riots were ignited by outsiders, alleges MLA Praveen Datke
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!