विशेष प्रतिनिधी
बीड : वाल्मिक कराड यांच्या मर्जीतील 26 अधिकारी आणि पाेलीस कर्मचारी असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांनी ते पुरावे पोलिसांना दिले आहेत.
तृप्ती देसाई यांनी बीडमध्ये जाऊन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडरकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वाल्मिक कराड याच्या निकटवर्तीय 26 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधात पुरावे दिले आहेत. त्यांनी यावेळी एक पेन ड्राईव्ह दिला आहे.
वाल्मिक कराड यांच्या मर्जीतील 26 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहेत. त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली.
देसाई म्हणाल्या, बारा प्रश्नांचे जवळपास उत्तर लिहून घेतले आहेत. काही पुरावे पेन ड्राईव्ह माध्यमातून व्हिडिओ आणि फोटो दिले आहेत. लवकरात लवकर या 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवले जावे. अनेक कर्मचारी चुकीचे काम करत आहेत. गोपनीय चौकशी करून तातडीने यावरती कारवाई करू असं आश्वासन दिले आहे.
26 police officers and employees in favor of Valmik Karad, Trupti Desai gave evidence in a pen drive
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!