विशेष प्रतिनिधी
मुंबई : Harshvardhan Sapkal काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सभागृहात केली.Harshvardhan Sapkal
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचे विधानपरिषदेत जोरदार पडसाद उमटले. याविषयी बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक म्हणून महाराष्ट्राने गेल्या ५ वर्षांत पाहिले. आजही राज्याचा कारभार उत्तम चालवत असताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हा फडणवीस यांचा व्यक्तिगत अपमान तर आहेच पण तर देशाला आदर्श ठरणाऱ्या, देशाला दिशा दाखविणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा अपमान आहे, या सभागृहाचाही अपमान आहे.
“राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मी जाहीर निषेध करतो. सभागृहाने याची गंभीर दखल घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना समज देण्याची किंवा कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची तुलना औरंगजेबाच्या राज्य कारभाराशी केली होती. यावरून आता वातावरण तापलं असून, आपण फडणवीसांवर नाही तर सरकारच्या राज्यकारभारावर टीका केल्याची सारवासारव सपकाळ यांनी केली.
मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली आहे, ते मला समजलं नाही. मी काही चुकीचं बोललो नाही. मी काही फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख मी केला नाही. देवेंद्र फडणीसांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच त्यांच्यामध्ये फरक आहे, असं देखील मी बोललो नाही. मी शुद्ध स्वरुपामध्ये जो राज्यकारभार आहे तो अत्याचार आणि अत्यंत क्रूर पद्धतीनं हे सरकार हाकत आहे, या संदर्भात माझी केलेली ही तुलना आहे.
Maharashtra is insulted by comparing the Chief Minister to Aurangzeb, demand action against Harshvardhan Sapkal
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप