विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadanvis ठरवून काही ठराविक घरांना, आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसतोय, अशी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.Devendra Fadanvis
नागपूर येथील हिंसाचाराच्या घटनेवर विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,सकाळची एक घटना घडल्यानंतर पूर्णपणे शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक असा हल्ला केल्याचं समोर येतंय. कारण जवळपास एक ट्रॉलीभरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर जमा करून ठेवलेले दगड पाहायला मिळाले. शस्त्रंही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे. वाहनांची जाळपोळ झाली आहे.
कुणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल.
तीन डीसीपी स्तरावरील पोलीस अधिकार्यांवर हल्ले करण्यात आले. एका डीसीपीवर तर कुऱ्हाडीने वार केला आहे. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्याला काही झाले तरी सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. कुणी दंगा करत असेल तर त्याच्यावर जात, धर्म न बघता कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांची जबाबदारी आहे, अशी विनंती त्यांनी जनतेला केली. सर्व समाजाचे धार्मिक सण या कालावधीत सुरू आहेत. सर्वांनी संयम ठेवला पाहिजे एकमेकां प्रती आदरभाव ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
एकूण तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एंट्री पॉइंटवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यात तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत”, असंही फडणवीसांनी सांगितले.
Well-planned pattern in Nagpur riots, specific houses targeted, Chief Minister’s information in the Assembly
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप