विशेष प्रतिनिधी
सातारा :Udayanraje द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं आहे. द्वेष त्यांनी पेरला आहे. मी आज भाजप म्हणून उत्तर देत नाही. देशाचा एक नागरिक म्हणून मी उत्तर देत आहे. औरंग्याच्या काबरीचं उदात्तीकरण होता कामा नये… तो काही संत नव्हता. त्याने देशात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यायी कबर काढली तर ती या देशाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.Udayanraje
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा घटक म्हणून मी बोलत आहे. समाज एकत्र ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आमदार, खासदार सगळ्यांची ही जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तिमत्व की ज्यांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला. लोकशाहीचा ढाचा रचण्याचे काम शिवाजी महाराज यांनी केले आहे. त्यामुळे त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपाने शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणण्याचे काम केले आहे एक व्यक्ती म्हणून मी हे सांगतो.
उदयनराजे म्हणाले, नागपूरच्या दंगलीचं कोणीच समर्थन करू शकत नाही. दंगल खोरांना जात पात नसते. सर्वधर्म समभावाचे विचार देशाला पुढे घेवून जातात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लवकरात लवकर शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा शासन मान्य असणारा इतिहास प्रकाशित करावा म्हणजे वाद होणार नाहीत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याबद्दल हल्ला चढविताना ते म्हणाले, हे हास्यास्पद आहे. ज्याने अशी तुलना केली त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडल असेल. त्याच्या चेकअपची गरज आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल क्रूर हा शब्द वापरला आहे. क्रूर असते तर फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नसते. दंगल घडवून आणणारे कुठल्या पक्षाचे नसतात. पोलिसांना सहकार्य करण्याचं काम समाजाने करणे गरजेचं आहे.
फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असं काही नाही. काँग्रेसची राजवट होती तेव्हा भरपूर दंगली व्हायच्या, त्याला मोठ्या प्रमाणात आळा घातला पाहिजेत असे उदयनराजे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शिवाजी महाराज यांच्या सहकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. त्यात मुस्लिम समाजाचे लोक होते आणि ते जबाबदार पदावर होते. नितेश राणे यांनी भावनेच्या भरात असं विधान केला असावं. राजीनामा मागण्याची अलीकडे एक फॅशन झाली आहे असेही उदयनराजे भोसले म्हणाले
Congress sowed hatred, throw Aurangzeb’s grave outside the country, Udayanraje’s attack
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!