विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा २०२५ या परीक्षेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही परीक्षा आता वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार आहे. मात्र या स्वरुपाला विद्यार्थ्यांकडून विरोध केला जात होता. मात्र ही परीक्षा वर्णात्मक स्वरुपातच होणार असून कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.Devendra Fadnavis
आमदार विक्रम काळे यांनी एमपीएससीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षेची सर्व प्रकिया होऊनही उमेदवारांचे पोस्टिंग होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच पोस्टिंग देण्यासाठी काही व्यवहार होतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणार असून युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील वेळापत्रक पाळले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर (वेळापत्रक) असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण वर्णनात्मक स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, या शब्दात फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसंदर्भात जाहिरात दिली जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान,अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना ह्या जागा भरण्यासंदर्भात पत्र दिले होते.
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगत अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्याने या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण आता लोकसेवा आयोगातील अभियांत्रिकी पदांसाठी होणाऱ्या परीक्षा मराठीत होणार आहेत. अभियांत्रिकी पदांच्या अभ्यासक्रमांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होणार असून इतर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा ही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.
MPSC State Services Exam will be in descriptive format only, Chief Minister Devendra Fadnavis clarifies
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप