विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबधित असलेले दिशा सालियन Disha Salian प्रकरणावर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
दिशाची हत्या झाली असून ती आत्महत्या करू शकत नाही. तिची हत्या आणि सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या हे दोन्ही प्रकरणे जोडलेली आहेत. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.
पण, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. 250 पानांच्या या याचिकेमध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. Disha Salian
मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप सदर याचिकेमध्ये करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले, तपासा वेळी पुरावे खरे मानण्यात भाग पाडले. तसेच त्यावेळी मुंबई पोलसांनी दबाव टाकल्याचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे, सुरज पांचोली, दिनो मोर्या यांच्यावर आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले आहेत.
भाजप नेते नितेश राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामींनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचा दावाही त्यांनी यामध्ये केला आहे.
दरम्यान, नितेश राणे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास व्हावा अशी मागणी करत आदित्य ठाकरेंची चौकशी करावी व्हावी असे आक्रमकपणे मांडत होते.
Disha Salian father files petition in High Court to make Aditya Thackeray an accused in Salian case
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप