कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात… सुषमा अंधारे यांची चित्र वाघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका

कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात… सुषमा अंधारे यांची चित्र वाघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या नेते भांबावून गेले आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या आमदार चित्र वाघ यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद हे विधिमंडळातही पाहायला मिळाले. भाजप आमदार चित्रा वाघदेखील चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांनी संजय राठोड यांचं नाव घेतल्याने चित्रा वाघ संतापल्या. अनिल परब यांच्यावर निशाणा साधताना चित्रा वाघ म्हणाल्या की, संजय राठोड मंत्रिमंडळात का आहेत? याचे उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

 

त्यामुळे संजय राठोड यांना का क्लिनचिट दिली? याचे उत्तर उद्धव ठाकरेंना विचारा. तुमच्यात हिंमत असेल तर विचारा त्यांना. तुम्ही असाल पोपट पंडित, पण माझ्या कुटुंबानं दोन वर्ष जे सहन केलं ते कधीही विसरू शकत नाही. खरंतर तुमच्यासारखे 56 परब पायाला बांधून फिरते. आम्ही वशिल्याने याठिकाणी आलेलो नाही.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चित्रा वाघ यांच्यावर ट्विटरवर टीका केली. त्या म्हणाल्या आहेत की सभागृहाची सुसंस्कृत परंपरा गरिमा धाब्यावर बसवत एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या 56 जण पायाला बांधून फिरते. ही भाषा कोणत्या शाळा महाविद्यालयात शिकवली जाते, हे माहीत नाही. पण हे दरवेळी सांगायची गरज काय? त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात!”

https://twitter.com/andharesushama/status/1902709221218480191

Sushma Andhare’s low-level criticism of Chitra Wagh

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023