विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sushant Singh Rajput आता सरकार बदलले आहे, पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात खूप फरक आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे की त्यांच्या पातळीवर जे करतील ते बरोबर करतील, अशी भावना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी व्यक्त केली आहे.Sushant Singh Rajput
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे १४ जून २०२० रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यूच्या एक आठवड्याआधी, त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनचे निधन झाले होते. दिशाने आत्महत्या केली होती की तिची हत्या झाली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र दोन्ही प्रकरणांचा परस्परांशी संबंध असल्याचीही चर्चा आहे.
याबाबत बोलताना के के सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, दिशा सालियनच्या वडिलांनी आधी म्हटले होते की, त्यांना काहीही माहिती नाही, ही आत्महत्या असू शकते. नंतर त्यांनी काय संशोधन केलं आणि कोणत्या आधारावर म्हणत आहे की ही आत्महत्या नसून हत्या आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. जे काही घडलं ते हत्या की आत्महत्या होती हे तरी किमान स्पष्ट होईल आणि सुशांतच्या प्रकरणात काय घडले हे देखील समोर येईल.
आता सरकार बदलले आहे, पूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार यात खूप फरक आहे त्यामुळे अशी आशा आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे की त्यांच्या पातळीवर जे करतील ते बरोबर करतील असा विश्वास व्यक्त करून के. के. सिंह म्हणाले, हे सर्व आधी व्हायला हवं होतं, मात्र तेव्हा त्यांचे सरकार नव्हते. आता हे प्रकरण पुन्हा समोर आल्याने सरकार नक्कीच लक्ष देईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, जेणेकरून ही आत्महत्या होती की हत्या हे कळू शकेल, अशी अपेक्षा आहे. तपास झाल्यास खरं काय ते समोर येईल.
सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंविरोधात एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या चौकशीच्या मागणीवर केके सिंह म्हणाले, “त्यांचे नाव संशयाने का घेतले जात आहे हे मला माहीत नाही. पण तपास झाल्यास नेमकं प्रकरण काय ते स्पष्ट होईल. यात कोणाचा सहभाग होता की नाही हे मी सांगू शकत नाही.
Sushant Singh Rajput’s father says, we have high hopes from the current Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार