विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis भारतीय जनता पक्षाशी युती तोडून शिवसेनेस पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध तोडले. त्यानंतर शिवसेनेत फूट पडून ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष झाला. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयीची नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. त्यांना आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडके म्हणायचे अशी खंतही फडणवीस यांनी व्यक्त केली.Devendra Fadnavis
एबीपी माझा या वाहिनीवर देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत द्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले.
लाडके ठाकरे कोण? उद्धव की राज ठाकरे? या प्रश्नवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे ठाकरे असे आहेत की, त्यांना आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडके म्हणायचे. कुठे भानगडीत पडता. गेल्या 5 वर्षांत उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही. माझा राज ठाकरेंसोबत संबंध राहिलेला आहे. उद्धव टाकरेंनी संबंध तोडून टाकले आहेत. मारामारी नाही. समोर आले की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो. मात्र, काहीही संबंध राहिले नाहीत.
लाडके उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे? यावर मिश्कीलपणे फडणवीस म्हणाले, दोघेही माझे लाडके आहे. मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहोत.
नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना आपण लाडके मंत्री आहोत असे म्हटले होते. गिरीश महाजन हे देखील फडणवीस यांचे जवळचे मानले जातात. यावर विचारलेल्या लाडका मंत्री कोण? गिरीश महाजन की नितेश राणे? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, लाडका मंत्री योजना सुरू केलेली आहे. त्याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणे अर्ज घेतलेले आहेत. त्याची कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही झाल्यावर सांगतो.
राज्यातील महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या सारख्या होतात. यावर सगळ्यात जास्त नाराजीनाट्य कोण करते? अजितदादा की एकनाथ शिंदे? यावर फडणवीस यांनी दोघांच्या स्वभावातील फरकच उलगून दाखविला. ते म्हणाले, नाराजीनाट्य कोणीच करत नाही. अलीकडे सोशल मीडियामुळे कुठल्याही गोष्टीला कसेही दाखवले जाते. अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीनाट्य नाही. अडचणी येतात, आम्ही बसून सोडवतो. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत. शिवसैनिक हा भावनिक असतो. अजितदादा हे प्रॅक्टिकल आहेत. अजितदादा प्रॅक्टिकल निर्णय घेतात. यांच्याशी वागताना प्रॅक्टिकल आणि भावनिक विचार करत असतो. तेवढे सांभाळले तर काहीही अडचण येत नाही.
Devendra Fadnavis’s clear statement on Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार