विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rahul Narvekar विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर चांगलेच भडकले मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागले, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.Rahul Narvekar
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामावरून प्रश्न उपस्थित केला. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र, या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ठ स्वरुपाचे काम झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही ठिकाणी काम रेंगाळल्याचे चित्र आहे. यंत्रणा काहीच माक करत नाही अशा शब्दात भातखळकर यांनी मुंबईतील रस्त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.
त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सामंत म्हणाले.
सामंत यांच्या या उत्तरानंतर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, आपली भूमिका मांडली. मला या विषयात बोलायचे नव्हते, पण मला बोलावे लागेल, माझ्या मतदारसंघात दोन-अडीच वर्षांपूर्वी पहिले टेंडर निघाले. कंत्राटदाराने काहीही काम केले नाही. सहा महिन्यांपूर्वी पुन्हा टेंडर काढले. अजूनही काम सुरू झाले नाही. ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून काढलेले, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारणे दाखवा नोटीस दिली आहे, दंड आकारला आहे. दंड वसूल करण्यासाठी महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही,
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते. पंरतु, प्रशासनाकडून ज्याप्रकारची कारवाई होत आहे, ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला निश्चितपणे गालबोट लागेल, अशी परिस्थिती आज आहे, अशी भावना नार्वेकरांनी व्यक्त केली.
राहुल नार्वेकर यांच्या या विधानानंतर भाजप आमदार अमित साटम यांनीही मुंबईतील रस्त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या रस्त्याचे काम अजूनही सुरू आहे. या कामामुळे आमच्या नाकीनऊ आलेत. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. मुंबईकरांची क्वालिटी ऑफ लाईफ काय? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यानंतर अमित देशमुख, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनीही रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. अखेरीस अध्यक्षांनी सोमवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदारांची बैठक घेण्याचे जाहीर केले.
Assembly Speaker Narvekar furious over the poor condition of the road in the constituency
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार