विशेष प्रतिनिधी
मुंबई : पानिपत हा मराठ्यांच्या पराभवाचा नाही तर शाैर्याचा इतिहास आहे. पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदेंनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकावला. या देशाकरिता मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झालेच पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे मराठयांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना पानिपत येथील स्मारकाची आठवण करून दिली. पानिपतचे कुठलेही स्मारक हे पराभवाची आठवण करून देणारे आहे. पानिपतात मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारूण पराभव झाला, हा इतिहास पुसता येणार नाही. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस स्मारक उभारणीचा पुनरुच्चार करताना म्हणाले, पानिपतची लढाई ही आमच्या शौर्याची लढाई आहे.
मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी पानिपतची लढाई झाली. ती लढाई मराठे जिंकलेच होते. या लढाईत मराठ्यांना कोणाचीच मदत झाली नाही, तरीही मराठे भारतासाठी लढले. पानिपतात गोलाची लढाई होती. पण दुर्देवाने गोल फुटला. तिथे पारडे अब्दालीच्या बाजूने झुकले. पण ही लढाई इथे संपत नाही. त्यानंतर महादजी शिंदेंनी 10 वर्षांनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एकछत्री अंमल आणला. अब्दालीला मराठ्यांनी इतके उध्वस्त केले होते की तो या देशात थांबलाच नाही, तो गावी परत गेला.
पानिपतच्या लढाईबाबत काही शल्य असेल पण आमचा पराभव झाला असे मी मानत नाही. पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदेंनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात लावला. या देशाकरिता मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झालेच पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Devendra Fadnavis reiterates that Panipat is the history of Maratha heroism, a memorial will be built
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप