विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister पुण्यात वाढत असलेल्या हुक्का पार्लरविषयी चिंता व्यक्त करत आमदार सुनील कांबळे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडला. यावर उत्तर देताना हुक्का पार्लरच्या विराेधात कडक कायदे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.Chief Minister
पुण्यात हुक्क्याची राजरोस विक्री सुरू असल्याबाबत भाजप आमदार सुनील कांबळे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हुक्का पार्लरवर नियंत्रण आणण्यासाठीचा कायदा अधिक कठोर केला जाणार असून वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय दुसऱ्यांदा हुक्का आढळून आल्यास सहा महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तर तिसऱ्यांदा हुक्का आढळल्यास संबंधित हॅाटेल, उपहारगृहाचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल.
तुरुंगात गेल्याशिवाय अनेकांना भीती वाटत नाही. त्यामुळे वारंवार गुन्हे करणाऱ्यांना अटक करण्याची व्यवस्था करण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. त्याशिवाय अनेकदा पार्ट्यांमध्ये हुक्का पुरवला जातो. समाज माध्यमांवरून अशा पार्ट्या आयोजित करण्यात येतात. या पार्ट्यांमधील हुक्क्याच्या पुरवठादारांवरही याचप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
फडणवीस म्हणाले की, हुक्का पार्लरवर कारवाईसाठी केलेला कायदा अधिक कडक करण्यात येणार आहे. एखाद्या उपहारगृहात, हॅाटेलमध्ये हुक्का सापडला तर त्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. त्याला तीन वर्षापर्यंतची शिक्षा आहे. या कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा हुक्का सापडला तर संबंधित उपहारगृह, रेस्टॉरंटचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात येईल. तसेच तिसऱ्यांदा हुक्का सापडला तर परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. तिसऱ्यांदा दाखल होणारा गुन्हा हा अजामीनपात्र असेल,
तत्पूर्वी, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी हुक्का पार्लरला परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. 2018 मध्ये कायदा करत हुक्का पार्लरवर सरकारने बंदी आणली होती. त्यानंतर काही हुक्का पार्लर चालक न्यायालयात गेले आणि हर्बल हुक्का विक्री करण्याची परवानगी आणली. या हुक्क्यात तंबाखू नसतो. मात्र, हर्बल हुक्क्याच्या नावाखाली तंबाखुजन्य हुक्क्याची विक्री होते. पोलिसांनी सतर्कता दाखवत गेल्यावर्षी 50 गुन्हे दाखल करत सव्वा कोटी रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती कदम यांनी दिली.
Pune’s hookah in the assembly, Chief Minister warns of strict laws
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप