विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Tax evasion “व्हॉट्सअॅप चॅटच्या मदतीने ₹२०० कोटींची बेहिशेबी रक्कम उघडकीस आली, गुगल मॅप्स हिजट्रीचा वापर करून रोख रक्कम लपवण्यासाठी वारंवार भेट दिलेली ठिकाणे शोधण्यात आली, तसेच इंस्टाग्राम खात्यांचे विश्लेषण करून बेनामी संपत्तीच्या मालकीचा खुलासा करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. त्यामुळे आता व्हाॅटसअॅप, इन्टाग्राम, गुगल मॅप्सच्या तपासातून हाेणार करचाेरी उघड Tax evasion
निर्मला सीतारामन यांनी नव्या कर विधेयकात कर विभागाच्या अधिकाऱ्यांना डिजिटल तपासणी करण्यास परवानगी तरतुदीचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की, कर चुकवेगिरी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी ही तरतूद महत्त्वाची आहे.
सीतारामन यांनी सांगितले की, सध्या कर तपासांमध्ये डिजिटल पुरावे – जसे की व्हॉट्सअॅप संदेश आणि गुगल मॅप्स स्थान डेटा आधीपासूनच वापरले जात आहेत, परंतु त्यांना कायदेशीर मान्यता देणे आवश्यक आहे. विद्यमान कर फ्रेमवर्क 1961 च्या प्राप्तिकर कायद्याद्वारे नियंत्रित आहे, जो मुख्यतः भौतिक नोंदींवर भर देतो. सध्या कर अधिकाऱ्यांकडून डिजिटल नोंदी मागितल्यास काही लोक म्हणतात, ‘मी माझे बहीखाते दाखवले आहे, मग माझा पासवर्ड का पाहिजे?’ ही तफावत दूर करण्यासाठी हा विधेयक प्रस्तावित करण्यात आला आहे
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, डिजिटल नोंदींच्या आधारे खालील प्रकरणांमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत: ₹२५० कोटींची बेहिशेबी संपत्ती व्हाॅटसअहपचे एन्क्रिप्टेड मेसेज उघड केल्यानंतर सापडली. व्हॉट्सअॅप मेसेजमधून बेकायदेशीर क्रिप्टो व्यवहार करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला. ₹९० कोटींची क्रिप्टो मालमत्ता सापडली. व्हॉट्सअॅप मेसेजचा तपास करून करून खोट्या चलनांची साखळी शोधण्यात आली. यातून ₹२०० कोटींचा बनावट बिलिंग घोटाळा उघड झाला. गुगल मॅप्स स्थान डेटा वापरून कर तपास: गुगल मॅप्स स्थान इतिहासाच्या आधारे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांचे ठिकाण शोधण्यात आले.
सीतारामन यांनी सांगितले की, नवीन विधेयकामुळे डिजिटल पुराव्यांना कायदेशीर आधार मिळेल. करचुकवेगिरी करणाऱ्यांना पळवाटा घेण्याची संधी मिळणार नाही. जर हे डिजिटल पुरावे कायद्यात सामील केले नाहीत, तर करचुकवेगिरी करणाऱ्यांना कायदेशीर त्रुटींचा फायदा घेता येईल,
Tax evasion will be exposed through investigation of WhatsApp, Instagram, Google Maps
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप