विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचा आराेप केला आहे. मात्र, दिशाच्या पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट (शवविच्छेदन अहवाल) समाेर आला असून डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचबराेबर सामुहिक बलात्कार झाला नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. Disha Salian
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार पत्र सादर केले. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण नव्याने चर्चेत आल्याने महाराष्ट्र विधिमंडळात गोंधळ झाला होता. तिचा पाच वर्षांपूर्वीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एका वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. या अहवालात दिशाच्या डोक्यावर गंभीर इजा असून शरीरावर गंभीर जखमा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण दिशावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे म्हटले आहे.
दिशा सालियानचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. मालाडमधील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर तिने आत्महत्या केल्याचाही अनेकांचा तर्क आहे. मात्र आता तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, दिशा खाली पडल्यानंतर तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच तिच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तिच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे या रिपोर्टमधून समोर आले आहे. दरम्यान, तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत दिशाचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिच्या शरीरावर जखमा नव्हत्या. तसेच रक्तही दिसले नसल्याचे म्हटले आहे. मात्र आता या पोस्टमोर्टम रिपोर्टमधून हा दावा चुकीचा ठरत आहे.
8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
तसेच दिशाच्या शरीरावर जखमा झाल्या असून त्या अनैसर्गिक आहेत. पण तिच्यावर कोणताही बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार झाला नाही. त्यामुळे दिशाच्या वडिलांनी जो आरोप केला होता त्याचा पुरावा मात्र यातून समोर येत नाही. असं असलं तरी दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचं नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला होता.
No Evidence of Gang Rape, Death Due to Head Injury: Disha Salian’s Post-Mortem Report Reveals
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप