विशेष प्रतिनिधी
मुंबई :CM Announces राज्याच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींवर कर लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलवर या अर्थसंकल्पात कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता EV वाहनावरील वाढवलेला 7 टक्के टॅक्स मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.CM Announces
विधान परिषदेत इलेक्ट्रीव्ह व्हेईकलच्या मुद्यावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्याही इलेक्ट्रिक असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, , आपण इलेक्ट्रिक व्हेईकलवर याआधी टॅक्स लावला नाही. 30 लाखांपर्यंतच्या गाड्यांना टॅक्स नव्हता. या कारवर कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, इतक्या किंमतीची ईव्ही कार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याशिवाय, या किंमतीच्या ईव्ही कारवर लावण्यात आलेल्या फारसा कर महसूल जमा होणार नाही. त्यामुळे हा वाढीव कर मागे घेण्यात येणार असून शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील, अशी घोषणाही त्यांनी केली. आमदारांना वाहनांसाठी दिले जाणारे कर्ज आता ईव्हीसाठीच देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
Good News for Electric Vehicle Buyers: CM Announces Rollback of EV Tax
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची