विशेष प्रतिनिधी
सातारा : Jayakumar Gore मी मंत्री झालोय हे शरद पवारांना अजून मान्यच होईना. माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे कधीच झुकणार नाही, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठणकावून सांगितले.Jayakumar Gore
माण तालुक्यातील आंधळी येथे बोलताना गोरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, माण खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर प्रचंड प्रेम केले. मात्र याच बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ लागली. त्यांना वाईट वाटायला लागलं की सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार झाला, सामान्य कुटुंबातला रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला याचं पवारांना वाईट वाटतंय. मी मंत्री झाल्याचं तर त्यांना मान्यच नाही. सगळ्या नेत्यांनी शरद पवारांसोबत तडजोड केली असेल. मात्र पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव आहे जो पवारांपुढे झुकला नाही.
गोरे म्हणाले, मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र यामुळे आपल्या शेतात पाणी आलं नसते .मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण खटावला पाणी मिळाले नसते. माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही l. मात्र ज्यांनी या तालुक्याला मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोधात आहे.
एका महिलेला असतील फोटो पाठवण्याच्या प्रकरणात जयकुमार गोरे यांना अडकवण्याचे षडयंत्र शरद पवार गटाचे नेते सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासह माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी रचल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता.
Jayakumar Gore said emphatically that he will never bow down to Pawar.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला